Sunday, May 15, 2016

चित्रपट गीतांच्या बुकात

जच्या तरुण पिढीला जर कुणी विचारलं की एखाद्या हिंदी सिनेमाच्या गाण्यांचे पुस्तक तुझ्याकडे आहे का?
तर ही पिढी आपल्याला खुळ्यात काढल्याशिवाय राहणार नाही.
कारण सध्या अशी हिंदी चित्रपट गीतांची पुस्तकं सहसा सापडणार नाहीत.
आता जमाना इन्टरनेट चा असल्याकारणाने पीसी, laptop किंवा स्मार्टफोन वर चुटकीसरशी आपल्याला Song Lyrics मिळतात. पण एक काळ असा होता की प्रत्येक चित्रपटगृहाच्या बाहेर ही पुस्तके सर्रास मिळायची. आणि लोक ती आवडीने घेऊन पाठ करायची.
हल्लीची गाणी ही फक्त दोन तीन आठवड्यांची मेहमान असतात असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. कारण तुम्हाला आवडणारी १० नवीन गाणी सांगा असे जर कोणी म्हटले तर हल्लीची TOP गाणी कोणती हे आठवायलाच बराच वेळ जाईल. उलट जुन्या गाण्यांमधली १० काय १०० जरी गाणी विचारली तरी कोणीही फटाफट सांगायला सुरुवात करेल.

तसे ही स्मार्टफोन मुळे वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे असे मला वाटते. पूर्वी सकाळी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवस उगवलाय असे वाटायचेच नाही. लोकल ट्रेन सारख्या गर्दीतल्या जागेत सुद्धा घड्या करून करून ती वाचली जायची. आजकाल लोकल मध्येही वर्तमानपत्र वाचणारे लोक फार कमी दिसतात. त्यातले बहुतांशी लोक असे असतात ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीये. कारण ज्यांच्याकडे तो असतो ते कानाला हेडफोन लाऊन त्यात गुंग असतात. काही एकेकटे राहून सोशल नेटवर्किंग करत असतात तर काही लांबून येणारे या वेळेत मोबाईलवर सिनेमा बघूनहा वेळ 'सत्कारणी' लावतात. तुम्ही तुमचा दिवसभराचा वेळ कसा सत्कारणी लावता ? जरूर सांगा.
 #‎जाने_कहां_गये_वो_दिन‬

© सचिन सावंत 

No comments:

Post a Comment