Tuesday, December 29, 2015

E N J O Y

एव्हाना 31st ची तयारी सुरु झाली असेल.
नवीन वर्षाचे स्वागत कशा प्रकारे करायचे यापेक्षा जाणाऱ्या वर्षाचा शेवटचा दिवस कसा एन्जॉय करायचा याचीच चिंता सर्वांना सतावू लागली आहे. पार्टी बाहेर करायची कि एखाद्या मित्राच्या घरात, कि टेरेस वर याचे प्लान आखले जात असतील. तसा आपला भारतीय समाज उत्सव प्रिय आहेच. आपल्याला काहीही सेलिब्रेट करायला फक्त निमित्तच हवं असतं. काही जण म्हणताहेत आम्ही मराठी आहोत नववर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्यालाच देऊ. चांगली गोष्ट आहे की. पण संपूर्ण वर्षभर जर आपण इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे चालत असू तर मग नवीन वर्ष ३१ डिसेंबर ला साजरे करायला काय हरकत असावी ?

पण सेलिब्रेट करताना स्वतः चे भान राहू द्या. दारू पिऊन गाडी चालवू नका. स्वतः सोबत इतरांचा ही जीव धोक्यात घालू नका. आणि हे ही लक्षात असू द्या कि आपण सलमान नाही आहोत.
यावेळी पोलिसांनी ही म्हणे फार मनावर घेतले आहे Drink & Drive चे.
असो.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपणा सर्वांना शुभेच्छा.
E N J O Y

Sunday, August 2, 2015

Friendship Day अर्थात मैत्रीदिन

गस्ट महिन्यातला पहिला रविवार हा 'Friendship Day' अर्थात मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो. सर्व जग या दिवशी मैत्रीमय होऊन जाते. खासकरून कॉलेज मध्ये फ्रेन्डशिप Band बांधून मैत्रीची भावना व्यक्त केली जाते. आजच्या Whatsapp आणि Facebook च्या जमान्यात मैत्रीचे स्वरूप बदलत गेले असले तरी मैत्री मात्र कायम आहे.

मला एक किस्सा अजून आठवतो, मी कॉलेज मध्ये असताना मैत्री चा विषय निघाला असता सर्व जणांनी आपापल्या मैत्रीबद्दलच्या भावना मांडल्या. त्यातला एक मित्र तर चक्क मैत्रीचे प्रकार सांगू लागला. म्हणजे खरा मित्र, गल्लीतले मित्र, शाळेतले मित्र, कट्ट्यावरचे मित्र वगैरे.. मला गम्मत वाटली. मी त्याला विचारले, " मी तुझा कोणत्या प्रकारचा मित्र आहे ?" तर तो चक्क म्हणाला 'कामचलाऊ'!! मला फार वाईट वाटले होते त्या वेळी. मग मी त्याच्याशी मैत्री कमी केली. पण त्याच्या या बोलण्यामागचे गौडबंगाल काय होते या गोष्टीचा उलगडा माझ्या दुसऱ्या एका मित्राने आत्ता अलीकडेच जवळजवळ १० वर्षानंतर केला. Actually त्या (कामचलाऊ वाल्या) मित्राचे एका मुलीवर (एकतर्फी) प्रेम होते. आणि ती व मी चांगले Friends असल्याने एकमेकांशी खूप बोलायचो. आणि यामुळेच त्या महाशयांचा जळफळाट व्हायचा. त्याला असा संशय होता की माझ्या आणि तिच्यात काहीतरी आहे. हा हा हा..... आणि तरीसुद्धा त्याने तिला शेवटपर्यंत स्वतःच्या प्रेमाबद्दल काहीही सांगितले नाही ते नाहीच.

मैत्री म्हणजे हळुवार बंध. निर्व्याज, निस्वार्थी मैत्री आजच्या काळात मिळणं हे भाग्याच समजले पाहिजे. आजकाल बरेच जण मनात काहीतरी उद्देश ठेउनच समोरच्या व्यक्तीशी मैत्री करतात. त्यात काही चुकीचे आहे असेही मी म्हणत नाही. कारण तसे नाही केले तर प्रत्येकाला आपापली कामे त्यातून निघण्याचा मार्ग बंद होईल. पण असे असले तरी प्रत्येकाला एखादा मित्र (किंवा मैत्रीण) असा असावा कि ज्याच्याशी आपल्या आयुष्यातली सर्व सुख दुःख शेयर करता आली पाहिजेत.

शाळा कॉलेज मधली मैत्री काल जसा जसा जाईल तशी दुरावत जाते. आपापले करियर घडवण्याच्या मागे, पैसा कमावण्याच्या मागे प्रत्येकजण लागतो, जबाबदार्या अंगावर येतात, आणि मैत्रीसाठी, मित्रांसाठी वेळ काढणे दुरापास्त होते. थोड्या थोड्या फरकाने सगळीकडे हेच चित्र आहे. अशा वेळी मला एका ग्रुप ची आठवण होतेय. हा ग्रुप कॉलेज सोडल्यापासून जवळजवळ आज २० वर्षे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी त्यांच्या एका ठरलेल्या रेस्टॉरंट मध्ये आवर्जून एकमेकांना भेटतो. फक्त तासाभरासाठीच. या तासाभरात ते आपली सुख दुःख एकमेकांशी शेयर करतात. आणि या एका तासाने त्यांना महिनाभर जगण्याची नवीन उर्मी मिळते. आपण सुद्धा त्यांचा हा वसा अमलात आणायचा प्रयत्न करू शकतो. काय हरकत आहे ? महिन्यातून एक तास आपण आपल्या मित्रांना देऊच शकतो की. आणि दर Friendship Day ला Whatsapp, Facebook वर नुसते मेसेज पाठवण्यापेक्षा एकमेकांना प्रत्यक्ष भेटून मैत्री EVERGREEN ठेऊ शकतो.

-

© सचिन सावंत 
image : गुगलवरून साभार.